‘मोदी @२०’ या पुस्तकाचं प्रकाशन कार्यक्रम पार पडल्यानंतर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, २००४ ते २०१४ या काळात देशात काँग्रेसप्रणित यूपीएचं सरकार होतं. यूपीएच्या शासनकाळात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर धोरण लकवा मारला जायचा, हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. यूपीएच्या काळात सरकारमधील अनेक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होते. पंतप्रधान असलेल्या मनमोहनसिंग यांनाच कुणी पंतप्रधान समजत नव्हतं, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर टिकास्त्र सोडलं आहे.