पुणे : पुण्यात पोटनिवडणुकीच्या ज्वर शिगेला पोहचला आहे. कसबा मतदार संघात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर आणि भाजप कडून हेमंत रासने निवडणूक रिंगणात आहेत. तर, चिंचवड मतदार संघात भाजपच्या अश्विनी जगताप तर महाविकास आघाडीचे नाना काटे रिगणात आहेत. तर राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे. या दोन्ही मतदार संघात निवडणूक प्रचाराचा जोरात सुरू आहे. भाजप आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते या मतदार संघात ठाण मांडून असून प्रचार रॅली, जाहीर सभा, घर भेटी सुरू आहेत. आता या निवडणूक प्रचारात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उतरणार आहेत. २१ आणि २२ फेब्रुवारीला ते या दोन्ही मतदार संघात फिरणार आहे.