भोपाळ : मध्यप्रदेशातील भोपालजवळ सिहोरच्या कुबेश्वर धाम येथे दरवर्षी ‘रूद्राक्ष महोत्सवाच’ भरवण्यात येतो. या महोत्सवात रुद्राक्ष घेण्यासाठी हजारो नागरिक येत असतात. पंडीत प्रदीप मिश्रा हे या महोत्सव आयोजित करत असून या महोत्सवात रुद्राक्ष मिळविण्यासाठी देशभरातून लाखोंची गर्दी झाली आहे. दरम्यान, राज्यातूनही अनेक भाविक या ठिकाणी गेले आहेत. या कार्यक्रमात मोफत रुद्राक्ष घेण्यासाठी अचानक झुंबड उडाली असून या वेळी झालेल्या गोंधळामुळे राज्यातील तीन महिला या बेपत्ता झाल्या आहेत. सिहोरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती मिळत आहे.