कोकिळाबेन रुग्णालयात तृप्तीवर उपचार करणारे क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉ. किरण शेट्टी म्हणाले की, आम्ही अलीकडेच अशा चार ते पाच केसेस पाहिल्या आहेत, त्यापैकी तीन प्रकरणे गेल्या महिन्यातील आहेत. चार प्रकरणांपैकी केवळ तृप्तीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. हिवाळ्यात गॅस गिझर सिंड्रोम (GGS) मध्ये सामान्य वाढ झालेले दिसते. याचे कारण लोक पाणी अधिक गरम करतात आणि शॉवरमध्ये जास्त वेळ घालवतात त्याचबरोबर बाथरूममध्ये व्हेंटिलेशन सुविधाही तितकी चांगली नसते, यामुळे त्यांचा श्वास गुदमरून स्थिती बिघडते. डॉ. शेट्टी यांनी म्हटले की, तृप्तीला अपघात झाला त्याच आठवड्यात अंधेरीच्या एका रहिवाशालाही असाच त्रास झाल्याने त्याला रुग्णालयात आणण्यात आले होते, मात्र त्याची प्रकृती तितकीशी गंभीर नव्हती. चार-पाच दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. गॅस गिझर सिंड्रोम (GGS) तेव्हा होतो जेव्हा शरीरात ऑक्सिजनची पातळी चिंताजनकरित्या कमी होते आणि रुग्ण बेशुद्ध होतो, कधी-कधी रुग्णाचा मृत्यूही होतो.