पप्पू असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नोकराचे नाव आहे. तो बऱ्याच दिवसांपासून मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या सुधीर चिपळूणकर (वय, ७२) आणि सुप्रिया चिपळूणकर (वय, ६५) या वृद्ध दाम्पत्याच्या घरी कामाला होता. मात्र, सोमवारी संध्याकाळी आरोपी नोकराने घरमालकांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सुधीर चिपळूणकर यांचा मृत्यू झाला. तर, सुप्रिया चिपळूणकर गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र, या घटनेने परिसरात एकचा खळबळ माजली आहे.