उद्धव म्हणाले की, आम्ही युती तोडली, कारण २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमच्यासोबत युती तोडली होती. तेव्हा आम्ही हिंदू होतो, आजही आहोत आणि उद्याही हिंदूच राहू. आम्ही त्यांची साथ सोडली, पण आम्ही हिंदूत्व सोडलेले नाही. भाजप म्हणजे काही हिंदूत्व नाही. त्यांचे हिंदूत्व आम्हाला मान्य नाही. द्वेषाचे राजकारण ते करत आहेत, असे हिंदूत्व आम्हाला मान्य नाही.