मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील हिंगणामध्ये आरोपी विनोदची मुलगी तिच्या दहावर्षीय मैत्रिणीला घेऊन घरी आली होती. त्यावेळी मुलगी काही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर आरोपीनं मुलीच्या मैत्रिणीशी अश्लिल चाळे करायला सुरुवात केली. परंतु फार वेळ होऊनही मुलगी घरी न आल्यानं आरोपीनं या संधीचा गैरफायदा घेत मुलीवर बळजबरीनं बलात्कार केला. त्यानंतर आरोपीनं मुलीला तिच्या घरी सोडून दिलं. घाबरलेल्या मुलीनं या प्रकरणाची माहिती कुणालाही दिली नाही. परंतु जेव्हा पीडितेच्या आईनं चॉकलेट कुणी दिलं होतं?, असा प्रश्न केल्यानंतर पीडित मुलीनं घडलेला सारा प्रकार आईला सांगितला.