महाराष्ट्रात गायीला माता म्हणता अन् शेजारच्या राज्यात खाता, हे कोणतं हिंदुत्व?, ठाकरेंचा भाजपला सवाल

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून भाजपसह काही हिंदुत्ववादी संघटनांनी लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोवंश हत्याबंदी कायद्याच्या मागणीसाठी राज्यातील अनेक शहरांमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले आहेत. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर आणि यवतमाळमध्ये जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले आहेत. त्यानंतर आता भाजपच्या या आंदोलनांवर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा आहे, मग भाजप हा कायदा देशभरात का लागू करत नाही?, म्हणजे महाराष्ट्रात गायीला माता म्हणायचं आणि शेजारच्या राज्यात गायींना खाता?, हे कोणतं हिंदुत्व आहे?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. मुंबईतील मीरा-भाईंदर येथील जैन मंदिराला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer