धीरज लिंगाडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते, मात्र अमरावतीची जागा काँग्रेसकडे गेल्याने धीरज लिंगाडे यांनी ऐन निवडणुकीत काँग्रेस पक्षात प्रवेश करून अमरावतीची तिकीट मिळवली. धीरज लिंगाडे हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते होते. बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटासोबत गेल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. मात्र धीरज लिंगाडे मातोश्रीशी एकनिष्ठ राहत उद्धव ठाकरेंसोबत राहिले. लिंगाडे आधीपासून मतदारसंघात निवडणुकीची मोर्चेबांधणी करत होता. यासाठी त्यांनी भेटीगाठी वाढवल्या होत्या. गेल्या दीड-दोन वर्षापासून ते झटत होते.