बीबीसीने ‘इंडिया : द मोदी क्वेस्चन’ नामक माहिती पट हा दोन भागात बनवला आहे. यात मोदी यांचा राजकारनातील प्रवेश आणि पक्षातील वाढते स्थान आणि गोध्रामधील रेल्वे जळीतकांडानंतर गुजरातमधील अनेक भागांमध्ये उसळलेल्या दंगलीबाबत राजकीय नेते, पत्रकार, दंगलीत प्राण गमावलेल्यांचे नातेवाईक आणि तुरुंगात असलेले पोलीस अधिकारी संजीव भट यांच्या मुलीची प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे. गुजरात दंगलीत निष्पाप लोकांचा जीव जात असताना तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भूमिका संशयास्पद होती, अशा प्रकारचं चित्रण बीबीसीच्या माहितीपटात करण्यात आलं आहे. या माहिती पटात इंग्लंडचे माजी विदेश सचिव जॅक स्त्रा यांची मुलाखत आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की इंग्लंडच्या सरकारने गुजरात दंगलीची चौकशी केली होती.