लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; संतापजनक घटनेनंतर आरोपीला अटक-young man arrested by police in rape case in lonikand pune

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील लोणीकंद परिसरात शिकणाऱ्या एका तरुणीला आरोपी हणमंत लग्नाचं आमिष दाखवून गेल्या वर्षभरापासून बलात्कार करत होता. तरुणीला हॉटेल आणि लॉजमध्ये नेवून आरोपीनं तिच्यावर बलात्कार करत त्याचा व्हिडिओही शूट केला होता. त्यानंतर आरोपीनं फसवणूक केल्याचं समजताच तरुणीनं त्याला जाब विचारायला सुरुवात केली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीनं पीडितेला अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याची धमकी दिली. त्यानंतर संतापलेल्या तरुणीनं तरुणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer