अखेर ठरलं, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे करणार शिवसेना-वंचित युतीची घोषणा-uddhav thackeray and prakash ambedkar will hold joint press conference tomorrow to announce alliance between shivsena and vanchit bahujan aaghadi

काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिल येथील स्मारकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी ‘आम्ही शिवसेनेवर फक्त लाईन मारतोय, अजून युतीबाबत काहीही ठरलेलं नाही’, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं शिवसेना आणि वंचितच्या युतीबाबतचा संभ्रम वाढला होता. परंतु आता दोन्ही नेते एकत्र पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा करणार असल्यामुळं भाजपसह शिंदे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी (जोगेंद्र कवाडे गट) युती करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि वंचितची युती होणार आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer