पीएम मोदींच्या दौऱ्यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल; प्रवासासाठी या मार्गांचा करा वापर-traffic routes change during prime minister narendra modi visit in mumbai city

बीकेसी आणि गुंडवलीसह वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दुपारनंतर संथ गतीनं वाहतूक सुरू असेल. एम एमआरडीए मैदान, बीकेसी मैदान, मेट्रो सात मार्गिका गुंदवली आणि मोगरापाड्याला मुंबई पोलिसांकडून उड्डाण प्रतिबंधक क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच पोलीस उपायुक्तांची सुरक्षेत हजेरी राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी २७ एसीपी, १७१ पोलीस निरिक्षकांसह तब्बल ३९७ पोलीस अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. याशिवाय अडीच हजार पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या, दंगल विरोधी पथकाची एक तुकडी आणि शीघ्र कृती दलाचे जवानही सुरक्षेत तैनात असणार आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer