माजी नगरसेवक मणियार शिवसेनेचे नगरसेवक होते. मात्र, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्याशी बिनसल्यानंतर व नाशिक जिल्हा शिवसेनेतील गटबाजीला कंटाळून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होती. शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी, नगरसेवक, शिंदे गटात सामील झाले. नाशिकमधील माजी नगरसेवकलवटे यांच्यासह नाशिक रोडमधील पाच माजी नगरसेवकांनी अलिकडेच शिंदे गटात प्रवेश केला. परिणामी देवळाली येथील प्रभाग क्रमांक २२ मध्ये शिंदे गटातर्फे लवटे हेच उमेदवार राहणार हे निश्चित आहे. लवटे शिंदे गटात गेल्यानंतर मणियार यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला.