‘भाजपचे अनेक मंत्री व आमदारांनी स्वत: मला फोन केले. पक्षानं आम्हाला तुमच्याविरोधात आंदोलन करायला सांगितलं आहे. पण तुम्ही काय चुकीचं बोललात हेच आम्हाला कळलेलं नाही, असं ते म्हणत होते. माझा फोटो आंदोलनात घ्यायचा, त्यावर फुली मारायची. राजीनाम्याची मागणी करायची आणि तो फोटो पक्षाच्या कार्यालयात पाठवायचा असा आंदोलनाचा पॅटर्नही दिला गेला होता, असं अजित पवार यांनी सांगितलं. खुद्द आंदोलन करणाऱ्यांच्या मनातच याबाबत संभ्रम आहे, याकडंही अजितदादांनी लक्ष वेधलं.