प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेनेसोबत आमची युती होत आहे. याची अधिकृत घोषणा करण्यात येईल. महाराष्ट्राला विकासाभिमुख करण्यासाठी व राज्यातील सर्व समाज समूहांच्या हक्कासाठी शिंदे आणि त्यांचा पक्ष कटिबद्ध आहे. थोर महामानवांच्या विचारावर आमची आघाडी काम करेल, असे त्यांनी म्हटले आहे.