Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा
छत्रपती संभाजी महाराजांच्या उल्लेखावरून पेटलेला राजकीय वाद सुरूच आहे. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्याचा आग्रह धरणाऱ्या भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष्य केलं आहे. आव्हाड यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे औरंगजेबाला ‘औरंगजेबजी’ म्हणतानाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तर, औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहतानाचा बावनकुळे यांचा एक फोटोही त्यांनी ट्विट केला आहे.