पत्रकार दिनी शकुंतला रेल्वेचा 111 वा वाददिवस साजरा करुण तालुक्यातील 65पत्रकार मित्र परिवार यांच्या झ।ला अचलपुर येथे सत्कार…

पत्रकार दिनी शकुंतला रेल्वेचा 111 वा वाढदिवस साजरा करुण तालुक्यातील 65 पत्रकार मित्र परिवार यांचा झाला अचलपुर येथे सत्कार

पत्रकार यांची शासन दरबारी नोंद व्हावी, या साठी सर्व पत्रकार संघटना एकत्र या/शकुंतला रेल साठी पीएमओ गाठा ……उमेश लोटे पावर ऑफ मीडिया

आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटन, शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिति अचलपुर,रोटरी क्लब अचलपुरचे पत्रकार दिनी आयोजन

आज 6 जानेवारी म्हणजे आद्य पत्रकार,आचार्य बालशास्त्री जाम्भेकर यांची जयंती व शकुंतला रेल्वेचा 111 वा वाढदिवस हा दुग्धशर्करा योग संजोगने घडून आला…आजच्या पत्रकार दिनी राज्य तथा केन्द्र सरकारच्या लक्ष वेधण्यासाठी एक आगड़े-वेगळे प्रतीकात्मक जन आंदोलन शकुंतला रेल्वेचा 111वा वाढदिवस साजरा करण्यात आला….तसेच अचलपुर-परतवाड़ा येथील पत्रकार मिंत्राचा सहस्नेह सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, दिनदर्शिका, पुष्प देवून मान्यवर यांच्या हस्ते सन्मान/सत्कार करण्यात आला..

पत्रकार दिन व शकुंतला रेलवेच्या वाढदिवस तथा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून आज रोजी कार्यक्रम अध्यक्ष म्हणून श्री उमेश लोटे मंत्रालय प्रतिनिधि पावर ऑफ मीडिया महा. प्रदेश, विशेष निमंत्रित मान्यवर मधे हिंदी दैनिक मंगल प्रहरचे संपादक श्री सुधिर गनवीर, विधर्भ न्यूज़ 365 चे प्रबंध संपादक अमोल नानवटकर तर सत्कार समारंभ मध्ये प्रमुख उपस्थितित तहसीलदार श्री संजय गरकल,आगार व्यवस्थापक परतवाड़ा जीवन वानखड़े,अवयव दान समितिचे डॉ राजेश उभाड़,प्राचार्य एकनाथ तट्टे बीएसपी कॉलेज,गजानन कोल्हे, अनिल पिम्पले, राजा धर्माधिकारी,योगेश खानजोडे हे उपस्थित राहिले…

तर माहुले फैब्रिकेटरचे ज्ञानेश विश्वकर्मा यांची शकुंतला रेल्वेची प्रतिकृति व शकुंतला रेल्वेचा केक ठरला आकर्षक व सेल्फी पॉइंट

जेष्ठ पत्रकार म्हणून वरिष्ठ पत्रकार संजय जोशी यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार, तर कार्यक्रम अध्यक्ष उमेश लोटे, मान्यवर आमंत्रित म्हणून सुधिर गनवीर, अमोल नानोटकर, तहसीलदार संजय गरकल यांचा शाल,श्रीफल,सन्मानचिन्ह, सन्मान पत्र, दिनदर्शिका देऊन करण्यात आला सहस्नेह सत्कार . सावित्री शक्तीपीठ पुणे, सत्यशोधक समितीच्या अध्यक्षा सौ . शीला चर्जन यांचेकडून सर्वांना सावित्री शक्तीपीठ दिनदर्शिका २०२४ भेट दिल्या गेली .

मराठी पत्रकार संघ अचलपुर, पॉवर ऑफ मीडिया संघटन अचलपुर, राज्य मराठी परिषद अचलपुर पदाधिकारी नरेंद्र जावरे, संजय अग्रवाल, राज इंगले, पंकज साबू, फ़िरोज़खान, मोइन चव्हाण, नितेश किल्लेदार, ललित काम्बले, प्रमोद नैकिले,महिला पत्रकार विनीता धर्मा,सोनाली सावले सहित सर्व पत्रकार मित्र परिवार यांचा सत्कार मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला

श्रध्दांजली:-स्व.संजय वड्डरकर,स्व.विनोद गुलक्षे,स्व.रवि नोवल या दिवंगत पत्रकारांना सर्व मान्यवर-पत्रकार यांच्या उपस्थितीत श्रध्दांजली दिली गेली .

मनोगत:- शकुंतला रेल व पत्रकार दिन प्रति मनोगत पॉवर ऑफ मीडियाचे उमेश लोटे, तहसीलदार संजय गरकल,डॉ.राजेश उभाड़, प्राचार्य एकनाथ तट्टे,आगार व्यवस्थापक जीवन वानखड़े यांनी व्यक्त केले

आयोजन/नियोजन:- पत्रकार दिन व शकुंतला रेल्वेच्या 25 टप्प्यातिल आंदोलनसह 6 जानेवारी कार्यक्रम साठी अथक प्रयास योगेश खानजोड़े, राजा धर्माधिकारी,राजकुमार बरडिया,ज्ञानेश विश्वकर्मा, गजानन कोल्हे,अनिल पिम्पले,राजेश अग्रवाल बैंकवाले,संजय डोंगरे,राजेन्द्र मूंदे, प्यारेलाल प्रजापति, सुरेश प्रजापती,दयानंद चंदेल,दीपा तायड़े, विजया फाटकर, सविता पुसदकर, शारदा उइके, धंनजय नकिल,राजेन्द्र जयसवाल,कमल केजरीवाल, संतोश नरेडी, एस.बी. बारखडे,विजय गोंड़चवर,रामदास मसने,पंकज शर्मा,भारती पावड़े, प्रगति केराम, निकिता वड़ड़गवकर, नरेंद्र ठाकुर, सोमा दहिकर, छोटेलाल बेलकर, एड प्रशांत बेलसरे सहीत सर्व सत्याग्रह समिति सदस्य यांनी समिति लोकवर्गनि मधून केले..

पूर्ण कार्यक्रमचे सुत्र संचालन:-माहिती योगेश खानजोड़ेने केले तर सर्व मान्यवर यांचे आभार राजा धर्माधिकारी यांनी मांडले

सांगता;-
कार्यक्रम अध्यक्ष उमेश लोटे यांनी राष्ट्रगीत जन-गण-मन म्हणून कार्यक्रमची सांगता केली.

संपादक:- संजय चोबीतकर
7744011100

navprabhasnews
Author: navprabhasnews

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer