पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार मंगळवारी दुपारी पालघरमधील शिवाजीनगर परिसरातून एका युवकाने ११२ या क्रमांकावर मोबाइलद्वारे मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. ११२ चे मुंबई व नागपुरातील लकडगंज पोलिस ठाण्याच्या नियंत्रण कक्ष आहे. मात्र, युवकाने केलेला फोन मुंबई नियंत्रण कक्षाला न लागता तो थेट नागपुरातील लकडगंज नियंत्रण कक्षाला लागला. यावेळी या युवकाने . सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेते धर्मेद्र तसेच मुकेश अंबानी यांच्या घरी बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगितले. काही तरुण तशी चर्चा करत असल्याचे देखील त्याने पोलिसांना सांगितले. हे काम २५ जण मिळून करणार आहे सांगत तरुणांचे फोन बंद केला.