रवींद्र परदेशी (वय ४८, रा. खारकर आळी, ठाणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यावर ठाण्यातील जांभळी नाका येथील शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ठाण्यातील मुख्य बाजार पेठेत त्यांचा कटलरीचा व्यवसाय होता. अंतर्गत वादातून त्यांची हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. दरम्यान, त्यांच्या हत्तेमुळे ठाण्यात तानावाचे वातावरण आहे. त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.