जलील म्हणाले की, मी सर्व जाती-धर्माचा खासदार आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबाद याचा काय सबंध आहे कुणी सांगावे. मग त्यावरून या शहराचे नाव का बदलणार. शहरांच्या नावाला तसा काहीही अर्थ नाही. तसे असेल तर कोल्हापूरच नाव छत्रपती शाहू नगर करा, पुण्याचे नाव फुले नगर अथवा फुले करा, नागपूरचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर करा कारण तिथं दीक्षाभूमी आहे. मुंबई या नावालाही तसा अर्थ नाही मग याचे नामांतर छत्रपती शिवाजी महाराजनगर असं करा. मालेगावला मौलाना आबाद नाव करा असे खासदार जलील यांनी सुचवले.