मुंबई सुशोभीकरणअंतर्गत अतिरिक्त ३२० कामांचे भूमिपूजन, रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणातील ५२ किमी लांबीच्या १११ कामांचा प्रारंभ,मलनिस्सारण वाहिन्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार पूनम महाजन, खासदार राहूल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार राजहंस सिंह, आमदार प्रसाद लाड, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.