नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी काँग्रेसच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद समोर आल्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांची काँग्रेस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर चेन्निथला यांनी मुंबईत येऊन काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली, त्यात काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीत काँग्रेस समितीचे सचिव रहमान खान नायडू, सदस्य प्रदेश काँग्रेस कमिटी प्रकाश मुगदीया, इक्राम हुसैन, सरदार महेंद्र सिंह सलूजा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. विदर्भातील या नेत्यांनी नाना पटोलेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमधील मतभेदांचे पडसाद काँग्रेसच्या रायपुरमधील अधिवेशनातही उमटणार असल्याची शक्यता आहे.