कसब्यातील मतदारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचं नाव आणि चिन्ह चोरणाऱ्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे. मी एकटाच गद्दारांशी लढतोय, जनता माझ्या पाठिशी आहे, कारण राज्यात अतिशय गलिच्छ राजकारण केलं जात आहे. आमच्यातल्या ४० लोकांनी जनतेशी गद्दारी केली असून ते चोर आहेत तर त्यांचा उल्लेख चोरटे असाच होणार असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.