मनसेच्या नेत्याला संजय राऊत यांची काळजी; पत्र लिहून व्यक्त केल्या भावना-mns leader sandeep deshpande writes to sanjay raut said take care

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संजय राऊत यांना निर्बुद्ध म्हणून हिणवल्यानंतर आता मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी राऊत यांना खुलं पत्र लिहिलं आहे. यात देशपांडे यांनी राऊत यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मनाविरुद्ध घटना घडल्या की माणसाचा संयम ढळतो. निराशेचे झटके येतात आणि माणूस लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. ही लक्षणं तुमच्यात दिसत आहे. तुम्ही वेळीच सावध होऊन काळजी घ्यायला हवी, असं देशपांडे यांनी म्हटलं आहे. देशपांडे यांनी या पत्रातून शिवसेनेची सध्याची अवस्था, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer