त्यावर न्यायालयाने आरोपीस नमाज पडतो का? नमाजचे नाव सांग अशी विचारणा केली. त्यावर दोन वेळा नमाज अदा करत असल्याचे त्याने सांगितले. त्यावर न्यायाधीशांनी २१ दिवस पाच वेळची नमाज फजर, जोहर, असर, मगरिब आणि इशा, अदा करण्याची आणि मशिदीच्या आवारात दोन झाडे लावण्याची शिक्षा सुनावली. झाडे लावतो की नाही याचा अहवाल देण्याचे निर्देष कृषी अधिकाऱ्याला दिले तर नमाज अदा करतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी मशिदीच्या इमामावर सोपवली आहे. शिक्षा भोगताना काही अडचण आल्यास पोलिसांची मदत घेण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत.