धंगेकर यांच्या समर्थनार्थ बोर्ड लावून “हू इज धंगेकर? कसबा तो झाकी है, कोथरूड अभी बाकी है” अशा मजकुराचे बॅनर्स देखील लावण्यात आले आहेत. चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आमदार आहेत. मुळे कसबा तो झाकी है, कोथरूड अभी बाकी आहे म्हणत पाटील यांच्यावर टीका केली आहे. समाज मध्यमावर ‘Who is Dhangekar’ ट्रेंड करत कविता, मीम्स आणि मेसेज व्हायरल होत आहे. Dhangekar is now MLA म्हणत आता कळलं का Who is धंगेकर असे देखील मेसेज समाज माध्यमांवर फिरत आहेत.