सर्वसामान्य नागरिकांची कामे पटापट करण्यात धंगेकर यांचा हातखंडा असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. धंगेकर यांचा मतदारसंघात जनसंपर्क दांडगा आहे. स्थानिकांनी कधीही फोन केल्यास त्यांना ते २४ तास उपलब्ध असतात, अशी त्यांची ओळख आहे. कसब्यात ‘आपला माणूस’ अशी त्यांची प्रतिमा आहे. स्कूटरवर बसून मतदारसंघात फेरफटका मारताना ते दिसून येतात. कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ते निवडून आले आहे. परंतु या विजयाचे ५० टक्के श्रेय स्वतः धंगेकर यांचे असून ५० टक्के महाविकास आघाडीचे श्रेय आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली होती.