काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर ११ हजारहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे आमच्या आमदाराला आता विधानसभेत जागा करावी लागणार आहे,असा खोचक टोला नाना पटोले यांनी सभागृहात भाजपला लगावला होता. यावर लगेच फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. तीन राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. मात्र काँग्रेस कुठेही दिसत नाही. कुठेतरी तुमचा विजय झाला तर तुम्हाला उभं राहून सांगावं लागतं. आता थोडं आत्मचिंतन तुम्ही करा,थोडं आत्मचिंतन आम्ही करू,असं फडणवीस म्हणाले. यामुळे कसब्यातील पराभवावर भाजप आत्मचिंतन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.