ओमानच्या सलाम एअरलाईन्सहे हे विमान आहे. हे विमान आज बांगलादेशच्या चाट्टोग्राम येथून मस्कत येथे जात होते. विमानाने उड्डाण घेतल्यावर अचानक या विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमानाच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागल्याने हे विमान तातडीने नागपूर विमानतळावर तातडीने उतरवण्यात आले. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीनमुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या विमानाचे सुखरूप लॅंडींग झाले. या विमानातील सर्व प्रवासी हे सुखरुप आहेत. या विमानात सुमारे २२० प्रवासी तर सात क्रू मेंबर्स होते. सध्या या विमानांची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे.