‘आम्हाला विधीमंडळाबद्दल आदर आहे. विधानसभा, लोकसभेविषयी आदर आहे. मी स्वत: खासदार आहे. लोकसभा, विधासभेचं पावित्र्य आम्हाला माहीत आहे. पण एका पक्षाच्या चिन्हावर, नेत्यांच्या मेहनतीवर निवडून यायचं आणि भाजपनं हाडूक टाकलं की ते तोंडात पकडून पळून जायचं. ह्याला काय म्हणायचं? ह्या चोरमंडळाला आपल्याला धडा शिकवायचा आहे,’ असं आवाहन राऊत यांनी केलं. ‘हे डरपोक आहेत. यातल्या १५, १६ लोकांवर सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स यांच्या कारवाया सुरू होत्या. नारायण राणेंच्या शंभर बोगस कंपन्या आहेत. किरीट सोमय्या आव आणून तुरुंगात टाकण्याची भाषा करत होते. पण राणे भाजपमध्ये गेले वॉशिंगमशीनमध्ये साफ झालं. स्वत: मुख्यमंत्री शिंदेंच्या पीएला अटक केली. त्यांच्यापर्यंत तलवार लावली, पळून गेले. यशवंत जाधव, प्रताप सरनाईक, भावना गवळी हे सगळे एक टोळी करून पळून गेले. अटकेला घाबरले, असा पाढाचा राऊत यांनी वाचला.