दुरुस्ती विधेयक मांडताना गिरीश महाजन म्हणाले, ‘ग्रामीण भागात नागरिकांना मोकाट जनावरांचा खूप त्रास होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध, आठवडी बाजाराच्या ठिकाणी मोकाट जनावरे बसलेली असतात. ही जनावरे झुंडीने शेतात घुसून पिके उद्धस्त करतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अनेक ठिकाणी मोकाट जनावरांकडून नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. वर्दळीच्या रस्त्यांवर मोकाट जनावरे बसून राहत असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत.’ अशी भूमिका मंत्री महाजन यांनी मांडली.