राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच दिवसाचे कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. तर रात्रीच्या वेळेला किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशी अवस्था राज्यातील काही भागात दिसून येत आहे. विदर्भातील अकोला, वाशिम तसेच रत्नागिरी, पणजी, अमरावती, पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात तापमानात वाढ झाली असून पुढील आठवड्यात तापमानात आणखी वाढ होणार आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीला हवामान विभागाने उष्णतेची लाट येणार असल्याचे म्हटले आहे.