मराठी भाषा दिनी बेळगावात मोदींचे कानडीत भाषण; व्हिडिओ ट्वीट करत विरोधकांचा हल्लाबोल-pm narendra modi kannada speech on marathi bhasha gaurav din in belgaum congress slams bjp

‘आजच्या मराठी भाषा गौरव दिनी बेळगावमध्ये जाऊन कन्नडमध्ये भाषण करून पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या जखमांवर मीठ चोळले नाही का?, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. ‘पंतप्रधानांना मराठीमधूनही शुभेच्छा देता आल्या नसत्या का? भाजपचा महाराष्ट्राबद्दलचा आकस यातून अधिक अधोरेखित होत नाही का?, अशी प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली आहे. ‘पंतप्रधानांच्या या कृत्यानं अतिशय वेदना होत आहेत, असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer