काही दिवसांपूर्वी नागपूर मेट्रो प्रशासनाने तिकीट दरात वाढ केल्यानंतर प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर मेट्रोने अनेक योजना सुरू केल्या आहेत. विद्यार्थ्यांना मेट्रोतून ३० टक्के सवलतीत पास योजना सुरू केली आहे. बारावी, पदवी, पदविका, आयआयटी, पॉलिटेक्निक व इतर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात ही सवलत मिळत आहे.