मोठी बातमी! पैसे वाटप आणि मारहाण प्रकरणी भाजप शहराध्यक्ष गणेश बीडकर यांच्यासह चौघांवर गुन्हा-pune bypoll case against bjp city president ganesh bidkar and four others in case of distribution of money and beating

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे युवक कॉँग्रेसचे पुणे लष्करी छावणी मतदारसंघाचे माजी अध्यक्ष आहेत. रविवारी मालधक्का चौकात त्यांचे मित्र, याकूब बशीर यांच्यासोबत फिरत होते. यावेळी त्यांना काही भाजपचे कार्यकर्ते हे आयशा कॉम्प्लेक्सजवळ मतदारांना पैसे वाटप करत असल्याची माहिती मिळाली. यानंतर ते आयेशा कॉम्प्लेक्स जवळ गेले असता त्यांना भाजपचे नगरसेवक गणेश बीडकर, मयूर चव्हाण, नईम शेख. बाला शेख हे उभे असल्याचे दिसले. त्यांच्या हातात केशरी रंगाची फिशवी आणि मतदारांच्या स्लिपा दिसल्या. पिशवीमध्ये पैसे असल्याचे म्हणत तुम्ही त्या मतदारांना वाटत असल्याचे म्हणत तक्रारदार आणि त्यांचे मित्र यांनी गणेश बीडकर यांना विचारणा केली असता त्यांना चौघांनी मिळून मारहाण केली. या नंतर ते घटनास्थळावरून पळून गेल्याची तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक माळी हे पुढील तपास करत आहेत.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer