नितू ऊर्फ जोया राजू बागडे, ज्योती चंद्रकांत सरदार, चंद्रकांत शंकर सरदार असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी ७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७ वाजता चाळीसगाव येथे बोलावले. त्यावेळी आरोपींनी पीडिताला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी पीडिताला तिच्या घरी पाठवले. दरम्यान, आरोपींनी १० फेब्रुवारी पुन्हा पीडिताला चाळीसगावला नेले, तिथे आरोपींनी २३ फेब्रुवारीपर्यंत पीडिताला अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडिताने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. यानंतर पीडिताच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.