अंबाबाई मूर्तीची सन १९२० पासून झीज होतअसून २०१५ मध्ये पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. तरीही मूर्तीची झीज सुरुच आहे. मूर्तीच्या हाताची बोटे व पावले याची झीज झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संवर्धन प्रक्रिया पुन्हा करण्यात आली तरीही झीज सुरू आहे.