संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘सहानुभूती मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेले धमकीचे आरोप हे फक्त कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला स्टंट आहे, याची सखोल चौकशी गृह विभागामार्फत होईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.