विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना घेऊन माझ्याकडे आले. त्यांच्याकडे आमदारांच्या सह्यांचं पत्र होतं, राजकारणात एका क्षणात गोष्टी बदलतात, मग एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली तर त्याचं नवल कशासाठी?, राष्ट्रवादीचे नेते माझ्याकडे आल्यानंतर ‘बहुमत असेल तर सिद्ध करा’, असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचंही भगतसिंह कोश्यारी म्हणाले.