रविवारी रात्री नवले पुलावर एक तरूणी जोरात ओरडत असल्याचा आवाज स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी ऐकला. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी संबंधित तरूणीला उडी मारू नको, अशी विनंती केली. परंतु, तरूणी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने वाहतूक पोलिसांनी त्वरीत नवले पूल परिसरातील एका हॉटेलमधून सतरंजी आणली. पोलीस आणि नागरिक सतरंजी धरून खाली थांबले. तर, काहीजण तिला वाचवण्यासाठी पुलाकडे निघाले. हे पाहताच तरूणीने ५० फुट उंचीवरून उडी मारली. पण ती सतरंजीवर पडली. ज्यामुळे तिला किरकोळ दुखापत झाली. पोलिसांनी ताबडतोब तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. संबंधित तरूणीने तरुणीने प्रेमप्रकरणातून नवले पुलावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, या घटनेवेळी आजूबाजुच्या परिसरात चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले.