‘इतक्या वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी, किल्ले शिवनेरीवर अजूनही कायमस्वरूपी भगवा ध्वज नाही. २०२१ पासून मी सातत्यानं ही मागणी करतोय. केंद्रीय मंत्र्यांना भेटलो आहे. आताही संसदेच्या पटलावर ही मागणी ठेवली आहे. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलतानाही मी या संदर्भात आग्रह धरला आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतही मी हा मुद्दा मांडला होता. ही शिवभक्तांची भावना आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. राज्य सरकारनं केंद्राकडं यासाठी पाठपुरावा करावा अशी माझी मागणी होती. मात्र, राज्य सरकाकडून काहीही ठोस पावलं उचलली जात नाहीत. माझ्या राजाच्या जन्मस्थानावर कायमस्वरूपी भगवा नाही याची जाणीव करून देण्यासाठी मी ही भूमिका घेतली आहे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.