वर्षाभरापूर्वी घाटकोपरच्या असल्फा परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या होती. दरम्यान, पाण्याच्या त्रासाने वैतागून गेलेले नागरिकांनी किरण लांडगे यांच्याकडे जाऊन ही समस्या सांगितले. समस्येचे गांभीर्य लक्षात घेत किरण लांडगे यांनी त्वरित मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यावेळी लांडगे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. या दरम्यान लांडगे यांनी पालिका अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर पालिका अधिकाऱ्याने लांडगे यांच्याविरोधात विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.