अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष तसेच सॉलिसिटर गुलाबराव शेळके महानगर बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके (वय ४६) यांचे शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११ वाजता त्यांचे मूळ गाव पिंप्री जलसेन (ता. पारनेर) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोध पक्षनेते अजित पवार यांचे ते विश्वासू कार्यकर्ते होते.