वंचित नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सन २०१९ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीनेच वंचितशी आघाडी केली नाही, त्यांनी वंचितला का नाकारले, ते त्यांना विचारावे लागेल. मी आज सांगतो की, ज्या आघाडी सोबत जाईन व ती आघाडी आमच्यासोबत प्रामाणित राहिली तर मी चॅलेंज देऊन सांगतो की, माझ्यासमोर नरेंद्र मोदी व भाजप फार मोठे आव्हान नाही.