कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्ते प्रकरणी आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. राऊत म्हणाले, पत्रकार शशिकांत वारिसे हे रिफायनिविरोधात आक्रमक भूमिका घेत होते. त्यांना या पूर्वी अनेकदा जीवे मारण्याची धमकी आली होती. या रिफायनरीच्या जवळ स्थानिक पक्षातील अनेकांनी जमिनी घेतल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात वारिसे हे खुपत होते. त्यांनीच त्यांचा खून घडवून आणला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.