नरेंद्र मोदी यांच्या आजच्या मुंबई दौऱ्यामुळे दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरातील काही मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. त्यामुळं मुंबईकरांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे.मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्वीटच्या माध्यमातून वाहतुकीतील बदलाची माहिती दिली आहे. त्यानुसार कुलाबा, रिगल जंक्शन आणि पी डमेलो रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंतच्या वाहतुकीवर दुपारी २ ते ४ या वेळेत काही प्रमाणात परिणाम होईल. त्याचबरोबर, देशांतर्गत विमानतळ ते मरोळपर्यंत उन्नत मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीत दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत किंचित बदल केला जाणार आहे.