मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस ठाकुर्ली ते कल्याण या स्थानकादरम्यान धावत असताना इंजिनमध्ये आग लागल्याचं रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीनं याबाबतची माहिती चालकाला देत रेल्वे थांबवण्याची सूचना केली. त्यानंतर रेल्वेच्या आपात्कालीन पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत आग विझवली. याशिवाय अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीला संपूर्णपणे आटोक्यात आणण्यात आलं आहे. त्यानंतर आता दुर्घटनाग्रस्त डब्यातून सर्व प्रवासांना खाली उतरवण्यात आलं आहे.