माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसला घरचा पक्ष समजून वागायला सुरुवात केली होती. त्यामुळं हायकमांडनं तातडीनं त्यांच्यावर कारवाई केली. ज्या लोकांना नव्या पद्धतीनं राजकारण करायचं असेल तर त्यांनी करावं, परंतु काँग्रेसविरोधात काम करणार असाल तर पक्ष त्यांच्याविरोधात कारवाई करणार आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी तांबेंसह थोरातांना इशारा दिला आहे.