पोटनिवडणुका बिनविरोध होतील हे डोक्यातून काढा; अजित पवारांनी भाजपला सुनावलं-ncp leader and lop ajit pawar comment on chinchwad and kasba peth bypoll elections today

Ajit Pawar On Pune Bypoll Elections : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यामुळं पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मविआने कसबा पेठची जागा कॉंग्रेसला तर चिंचवडची जागा राष्ट्रवादीला दिली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपनेही दोन्ही जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला दोन्ही जागा बिनविरोध निवडून आणण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता यावर राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपला चांगलंच सुनावलं आहे.

Source link

Author:

गुजरात में किस पार्टी की सरकार बनेगी?
  • Add your answer